Headlines

काऱ्हाटी संकुलात रक्तदान व मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिर उत्साहात संपन्नविद्यार्थांचा उत्स्फूर्त सहभाग; रेड क्रॉस सोसायटीचे सहकार्य

काऱ्हाटी (बारामती) – आयएसओ ९००१:२०१५ मानांकित कृषि उद्योग मूल शिक्षण संस्था (KUMSS),काऱ्हाटी संकुलात रक्तदान शिबिर व मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिर उत्साहात पार पडले.संस्थेच्या अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मा.श्रीमती सुनेत्रा (वहिनीसाहेब) अजितदादा पवार यांच्या ६३ व्या वाढदिवसानिमित्त शनिवार,दि. १७ ऑक्टोबर रोजी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरासाठी रेड क्रॉस सोसायटीचे सहकार्य लाभले.

शिबिराचे उद्घाटन सकाळी १० वाजता झाले.त्यानंतर दुपारी ४ वाजेपर्यंत शिबिर सुरू होते.या उपक्रमाला नागरिक,विद्यार्थी व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिवसभरात रक्तदान व हिमोग्लोबिन तपासणीसाठी एकूण १२७ जणांनी सहभाग नोंदविला.

या प्रसंगी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजीनाना होळकर,श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील नारायण भगत, रवींद्र जयवंतराव भापकर,राजेंद्र हरिभाऊ बोरकर,मकरंद चंद्रकांत सस्ते,माजी व्हाईस चेअरमन आनंद होळकर,बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार,बारामती तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पोमणे, कृषि उत्पन्न बाजार समिती,बारामतीचे माजी सभापती शौकत सिकंदर कोतवाल, काऱ्हाटीच्या सरपंच सौ.दिपाली योगेश लोणकर,माळवाडीच्या सरपंच सौ.मंजू दीपक लडकत, काऱ्हाटीचे माजी उपसरपंच गणेश शिंदे,सामाजिक कार्यकर्ते नितीन पोमणे,दत्तात्रय भापकर,लखन भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री.दशरथदादा धुमाळ,विश्वस्त मा. श्री. दत्तात्रय वाबळे, संकुलातील सर्व विभागांचे प्राचार्य, प्राचार्या,उपप्राचार्य,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रक्तदानातून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याबरोबरच हिमोग्लोबिन तपासणीच्या माध्यमातून आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपणारा ठरला. संस्थेच्या वतीने शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या रेड क्रॉस सोसायटीचे, उपस्थित मान्यवरांचे आणि सहभागी नागरिकांचे आभार व्यक्त करण्यात आले.अशी माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.विकास संजय निर्मळ यांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष श्री.दशरथदादा धुमाळ यांनी केले तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन श्री.विजय काळे यांनी केले.