Headlines

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणी सुनेत्रावहिनी पवार ॲक्शन मोडमध्ये; पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाईचे निर्देश

बारामती : बारामती विमानतळ परिसरात राणा शिपिंग कंपनीचे मालक श्री. राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेला हल्ला ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशा प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी व्यक्त केली.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. संबंधित हल्लेखोरांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणालाही खेळू दिले जाणार नाही. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राणा सूर्यवंशी यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभावे, अशी सदिच्छा उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी व्यक्त केली.