बारामती – पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ.हर्षदा देशमुख जाधव यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती शहर कार्यालयात शहर आढावा बैठक संपन्न झाली.
या बैठकीस पक्षाचे प्रमुख नेते, बारामती शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीमध्ये बारामती शहरातील प्रचाराचे नियोजन,पदवीधर मतदारांशी संपर्क,प्रभागनिहाय समन्वय आणि प्रचाराची पुढील दिशा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
सौ.हर्षदा देशमुख जाधव यांच्या प्रचारासाठी बारामती शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने आणि समन्वयाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रचारकार्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले.
