Headlines

वाहतुकीस अडथळे ठरणारे बंद टोल नाके हटवावेतमोशी

पुणे नाशिक रस्त्यावर मोशी आणि राजगुरुनगर येथील टोलनाके बंद करून बराच कालावधी उलटला आहे. मात्र तरीही येथील टोल नाक्यांचे सांगाडे अद्यापही हलवले नसल्याने नागरिकांना त्रासदायक होत आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती, औद्योगिक वसाहती, जड वाहनांची वाहतूक याशिवाय देहू आळंदी या तीर्थस्थळांकडे जाणारी मोठी वाहतूक आहे. सतत वर्दळीची अव्यात वाहतूक सुरू असल्याने वाहतुकीस हे बंद टोलनाके अडथळा होत आहेत. याशिवाय टोल नाक्यांच्या परिसरात
कसलेही सुरक्षाविषयक उपाययोजना केल्या नसल्याने रात्रीच्या वेळी वाहने धडकून अपघात होऊ शकतो. महामार्ग प्रशासनाने हे दोन्ही बंद टोलनाके त्वरित हटवून वाहतुकीचा अडथळा दूर करावा. याशिवाय टोल नाके हलवल्यानंतर महामार्गाची दुरुस्ती करून महामार्ग वाहतूक योग्य करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.