Headlines

दौंड पश्चिम पट्ट्यातील शैक्षणिक क्षेत्रातील लिंगपिसाट एका शिक्षकाची चर्चा!

शिक्षकाच्या कथित गैरवर्तनाची चर्चा
विद्यार्थिनींशी अनुचित संबंधांचे आरोप; संबंधित शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी

दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्या मधील उच्च माध्यमिक विद्यालयातील एका शिक्षकाने अनेक विद्यार्थिनीशी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली असून नागरिकांमधून दबक्या आवाजात बोलले जात आहे.

दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील एका उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकाच्या कथित गैरवर्तनाबाबत परिसरात चर्चेला उधाण आले असून, या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्राच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

संबंधित शिक्षकाने विद्यार्थिनींशी अनुचित जवळीक साधल्याचे तसेच यापूर्वीही अशा प्रकारच्या तक्रारी असल्याचे आरोप चर्चेतून पुढे येत आहेत.

ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबांना शहरातील महागडे शिक्षण परवडत नसल्याने पालक आपल्या मुलींना जवळच्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश देऊन शिक्षणाची संधी उपलब्ध करून देतात. अशा परिस्थितीत विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही शैक्षणिक संस्थांची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी ठरते.

शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नाते हे विश्वास, संस्कार आणि मार्गदर्शनाचे असते. या नात्याला बाधा पोहोचविणाऱ्या कोणत्याही प्रकाराची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. शिक्षकाच्या कथित गैरवर्तनामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होत असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, संबंधित शिक्षकाला संस्थाचालकांकडून पाठीशी घातले जात असल्याचीही चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, या संदर्भातील अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.आरोपांची निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणण्याची मागणी होत आहे.

या प्रकरणाची शिक्षण विभागाने तातडीने दखल घ्यावी, विद्यार्थिनींचे जबाब सुरक्षित वातावरणात नोंदवावेत, तसेच आरोप सिद्ध झाल्यास संबंधित शिक्षकावर नियमानुसार कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी पालक व नागरिकांमधून होत आहे.
विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेशी तडजोड नको, तसेच शिक्षकपदाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविणाऱ्या घटनांवर कठोर भूमिका घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.