Headlines

शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनात २५०हून अधिक शस्त्र शिव कामगार सेनेच्या वतीने आयोजन

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन पुणेकरांना व शाळेतील विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी शिव कामगार सेनेच्या वतीने विनामूल्य ठेवण्यात आले आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे कलादालन, सारसबाग येथे या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन आज शुक्रवार विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. हे प्रदर्शन येत्या ११ नोव्हेंबर पर्यंत सकाळी १० ते रात्री १० पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.

शिवगर्जना मर्दानी आखाडा यांच्या या शास्त्र प्रदर्शनामध्ये भाला, तोफ, तलवार, वाघनखे, चिलखत, कट्यार, सांग, ढाल, बारुद दान, दांडपट्टा, शमशेर, बिचव्या, आदी २५० विविध प्रकारचे क्षेत्र एकाच ठिकाणी पुणेकरांना अनुभवायला मिळणार आहेत. नागरिकांनी, शाळकरू विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात भेट द्यावी असे आवाहन आयोजक सुधीर कुरुमकर यांनी केले.

दिवाळी सणानिमित्त शिव कामगार सेनेच्या वतीने पुणेकरांसाठी ५ ते ११ नोव्हेंबरदरम्यान विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिव कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुधीर कुरूमकर यांच्या विशेष पुढाकारातून सारसबाग येथील शिवसेना भवन आणि बाळासाहेब ठाकरे कलादालन येथे हे कार्यक्रम होणार आहेत. या उपक्रमांत काल गुरुवारी वसुबारस पूजन निमित्ताने गोमातेचे पूजन करण्यात आले व गोशाळेत एक क्विंटल चारा दान देण्यात आला. सोबतच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व त्यांना दिवाळी किटचे वाटप करण्यात आले. या किट मध्ये वेद उपयोगी वस्तूंचा समावेश करण्यात आला असून शिवसेना भवनच्या परिसरात दिवे लावण्यात आले होते.