Banaras – Pune (Hadapsar) Amrit Bharat Express welcomed at Hadapsar Railway Station in the presence of Honorable Mayor Manjushatai Nagpure.

Photo of author

By Sandhya

बनारस – पुणे (हडपसर) अमृत भारत एक्सप्रेसचे हडपसर रेल्वे स्थानकावर माननीय महापौर मंजुषाताई नागपुरे यांच्या उपस्थितीत स्वागत..

पुणे: भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकताना, माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांनी दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी बनारस – पुणे (हडपसर) अमृत भारत एक्सप्रेस या नव्या रेल्वे सेवेचे उद्घाटन केले.
या ऐतिहासिक प्रसंगी, पुणे महानगरपालिकेच्या महापौर मा. श्रीमती मंजुषा नागपुरे यांच्या उपस्थितीत ३० एप्रिल २०२६ रोजी रात्री ०० वाजून २५ मिनिटांनी हडपसर रेल्वे स्थानकावर या गाडीचे भव्य स्वागत करण्यात आले.
मध्य रेल्वे, पुणे विभागाच्या वतीने विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. एच. कुमार वर्मा (IRSS) यांनी हा स्वागत समारंभ आयोजित केला होता.
या कार्यक्रमास नगरसेवक सुनीलजी पांडे ,नगरसेवक मारुती आबा तुपे ,नगरसेवक रविंद्रजी साळेगावकर उपस्थित होते..

अमृत भारत एक्सप्रेसची वैशिष्ट्ये:
अमृत भारत एक्सप्रेस ही गाडी प्रवाशांना जागतिक दर्जाचा प्रवास अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. यामध्ये एर्गोनॉमिकली डिझाईन केलेले बर्थ, स्वयंचलित दरवाजे, उन्नत स्वच्छता सुविधा, आणि कवच या अत्याधुनिक सुरक्षा प्रणालीचा समावेश आहे.
या उद्घाटन सोहळ्यात पुढील दोन नव्या गाड्यांचे लोकार्पण करण्यात आले:
१. बनारस – पुणे (हडपसर) अमृत भारत एक्सप्रेस
२. अयोध्या कॅन्ट – मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस) अमृत भारत एक्सप्रेस
महापौर मा. श्रीमती मंजुषा नागपुरे यांनी यावेळी सांगितले की, “हडपसर रेल्वे स्थानकावर अमृत भारत एक्सप्रेसचे आगमन हे पुणेकरांसाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. भारतीय रेल्वेच्या या आधुनिक सेवेमुळे पुणे आणि बनारस या दोन सांस्कृतिक शहरांमधील दळणवळण अधिक सुलभ होणार आहे.”

Leave a Comment

You cannot copy content of this page