
राष्ट्रवादी शहर पक्ष कार्यालयात महिलांसाठी एसटी स्मार्ट कार्ड शिबिराचे आयोजन…महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भारतातील सर्वाधिक मताधिक्याने विजयी आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बारामती शहराच्या वतीने महिलांसाठी विशेष एसटी स्मार्ट कार्ड शिबिराचे आयोजन (दि:८) रोजी करण्यात आले आहे.महिलांना सवलतीच्या दरात एसटी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय,शारदा प्रांगण येथे सुरू असलेल्या या शिबिराचे उद्घाटन बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन सातव तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष ॲड.किरण इंगळे यांच्या हस्ते संपन्न झाले.या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर युवक अध्यक्ष अभिजीत घाडगे,राष्ट्रवादी शहर पक्ष कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) सुरज देवकाते,विद्यार्थी अध्यक्ष मेघराज माने,उपाध्यक्ष अन्सारभाई आत्तार, सुधीर पोद्दार,शैलेश वनवे,नवनाथ अपुणे,शब्बीरभाई शेख,अश्विनी तावरे,हेमल शहा,ॲड.रमेश कोकरे,योगेश पवार,यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
उपस्थित मान्यवरांनी महिलांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,खासदार पार्थ पवार तसेच युवा नेते जय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ग्रामीण व शहरी भागातील महिला प्रवाशांना मोठा लाभ होणार असल्याचे सांगण्यात आले.शुक्रवार दि. ८ मे ते रविवार दि. १० मे २०२६ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हे शिबिर सुरू राहणार आहे.या शिबिरामध्ये १२ वर्षांवरील प्रत्येक युवती व महिलांसाठी एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड उपलब्ध करून देण्यात येत असून,एसटी प्रवासासाठी हे कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. महिलांना सवलतीच्या दरात हे कार्ड उपलब्ध करून देण्यात येत असून, कार्डासाठी केवळ १३० रुपये शुल्क आकारले जात आहे.विशेष म्हणजे हे कार्ड एकदाच काढायचे असून त्याला कोणतीही कालमर्यादा नसल्याने ते कायमस्वरूपी वैध राहणार आहे.
कार्ड काढण्यासाठी महिलांनी आधार कार्ड सोबत आणणे तसेच स्वतः उपस्थित राहणे आवश्यक असल्याची माहिती शहराध्यक्ष ॲड. किरण इंगळे यांनी दिली.या उपक्रमामुळे महिलांना एसटी प्रवास अधिक सुलभ होणार असून शासनाच्या सवलतींचा थेट लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांसाठी एसटी स्मार्ट कार्ड शिबिर १० मे पर्यंत सुरू
“बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, शारदा प्रांगण येथे महिलांसाठी आयोजित करण्यात आलेले विशेष एसटी स्मार्ट कार्ड शिबिर शुक्रवार दि. ८ मे ते रविवार दि. १० मे २०२६ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. १२ वर्षांवरील प्रत्येक युवती व महिलांसाठी एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड उपलब्ध करून देण्यात येत असून, कार्डासाठी केवळ १३० रुपये शुल्क आकारले जात आहे. कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड सोबत आणणे तसेच संबंधित महिलांनी स्वतः उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे आवाहन बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष ॲड. किरण इंगळे यांनी केले आहे.”