“Information Saturday”: Education Minister Dadaji Bhuse’s significant decision; teachers to get more time for teaching.

Photo of author

By Sandhya

“माहितीचा वार शनिवार” : शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांचा महत्त्वपूर्ण निर्णय, शिक्षकांना अध्यापनासाठी मिळणार अधिक वेळ


शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या माध्यमातून
शिक्षकांच्या शैक्षणिक व अशैक्षणिक कामाच्या अनुषंगाने सूचना करण्यात आल्या होत्या. त्या सूचना विचारात घेऊन शिक्षकांची शैक्षणिक कामे, अशैक्षणिक कामे व बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील नुसार महत्त्वाच्या कामांचे वर्गीकरण केले आहे. त्यानुसार शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी दर शनिवारी शालेय स्तरावरील माहिती सदर करण्याचा महत्वाचा निर्णय शैक्षणिक वर्ष २०२६-२७
घेतला आहे.

या निर्णयामुळे शिक्षकांचा अतिरिक्त कामाचा ताण कमी होऊन विद्यार्थीची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी वेळ मिळणार आहे. शाळास्तरावरील विविध समित्यांचे एकत्रीकरण करुन ०४ समित्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये U-DISE + व SARAL प्रणालीचे एकत्रीकरण करुन एकाच पोर्टलवर माहिती भरण्याची सुविधा दिली आहे. याशिवाय PM Poshan योजनेमध्ये नोंदवहीतील नोंदीचे काम कमी होण्यासाठी पोर्टलवर सुविधा देऊन लातूर जिल्ह्यासाठी पथदर्शी अभ्यास करण्यात आला. अशा प्रकारे राज्यस्तरावरुन शिक्षकांचा शैक्षणिक बाबीं संदर्भात माहिती सादर करण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आले.

सद्यस्थितीत केंद्रशासनाच्या/राज्यशासनाच्या विविध उपक्रमांचा अहवाल Online/Offline स्वरुपात शाळास्तरावरुन द्यावा लागतो. तसेच जिल्हास्तर/तालुकास्तर/केंद्रस्तरावरही माहिती शाळांना द्यावी लागते. यामुळे शिक्षकांचा अध्ययन-अध्यापनाचा वेळ माहिती तयार करण्यात व Online/Offline स्वरुपात माहिती सादर करण्यात जास्त वेळ जात असल्याचे निदर्शनास येत आहे.

प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत राज्यातील पन्हाळा, जिल्हा-कोल्हापूर, आष्टी जिल्हा-बीड, अक्कलकुवा, जिल्हा-नंदूरबार, एटापल्ली जिल्हा-गडचिरोली या तालुक्यातील प्रत्येकी एका केंद्रामध्ये ‘माहितीचा वार शनिवार’ या उपक्रमाची पथदर्शी स्वरुपात अंमलबजावणी करण्यात आली आहे. यामध्ये आठवड्याभरात जी काही माहिती Online/Offline स्वरुपात मागितली होती, ती सर्व माहिती दर शनिवारी सादर करण्यात येणार आहे.
शिक्षण मंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे ९० टक्के शिक्षकांनी आनंद व्यक्त केला असून, शिक्षकांना शिकविण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला असे मत ९६.६ टक्के शिक्षकांनी व्यक्त केले. सतत माहिती भरण्याच्या कटकटीतून काही प्रमाणात सुटका झाली आहे. शिक्षकांना वर्गातील अध्यापनासाठी अधिक वेळ मिळाला, विद्यार्थ्यांशी अधिक संवाद साधण्याची संधी मिळाली.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले की,
“शिक्षकांना जास्तीत जास्त वेळ हा विद्यार्थीना शिकवण्यासाठी देता यावा, विद्यार्थीना गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण मिळावे. हा शासनाचा प्रयत्न आहे. यामुळे शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा ताण कमी होईल आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी अधिक वेळ देता येईल.
तसेच विविध समित्यांचे एकत्रीकरण, पोर्टलचे सुलभीकरण आणि माहिती सादरीकरणाची प्रक्रिया सुसंगत केल्यामुळे शालेय प्रशासन अधिक कार्यक्षम होईल. शिक्षकांना सक्षम करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे हेच या निर्णयामागील प्रमुख उद्दिष्ट आहे.”

Leave a Comment

You cannot copy content of this page