

आरोग्यदूत मंगेशजी चिवटे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
आरोग्य समन्वयक प्रवीण सोनू माकर यांच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप
गोजूबावी – शिवसेना मुख्य नेते आदरणीय मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचे विशेष कार्यकारी अधिकारी व उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मा.श्री.मंगेशजी चिवटे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रविण सोनू माकर यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा,अंगणवाडी शाळा गोजुबावी शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे सरस्वती फोटोचे पूजन करण्यात आले. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळेस गोजुबावी गावच्या सरपंच प्रतिक्षा सचिन भोसले,सचिन भोसले,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल दत्तात्रय आटोळे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक कल्याण विठ्ठल गवळी,आशा सुखदेव वाघमारे,प्रिया अमोल नाळे,अंगणवाडी शिक्षिका कामिनी सत्यवान भोसले,अलका लालासो गटकळ,अंगणवाडी मदतनीस धनश्री सचिन गावडे,जयश्री कैलास आटोळे,विद्यार्थी,पालक,पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थिती होते.यावेळी सर्वांच्या वतीने मंगेशजी चिवटे साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.