देवेंद्र फडणवीस जेव्हा जेव्हा गृहमंत्री होतात तेव्हा नागपूरमध्ये गुन्हेगारी वाढते. हे मी म्हणत नाही, तर डाटा सांगतो. नागपूर ही क्राईम सिटी झाली आहे, असं म्हणत शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी शरद पवार, जयंत पाटील, अनिल देशमुख , रोहिणी खडसे उपस्थित होते.
पुढचे १२ महिने आपण इलेक्शन मोडमध्ये आहोत. आजच्या बैठकीत त्याबाबत दिशा ठरेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीत आले की, काय भूकंप होणार अशी बातमी व्हायची. पण आता पालकमंत्री ठरवण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत येतात, असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
समुद्धी महामार्गाने खऱ्याअर्थाने नुकसान झालं आहे. त्याच ॲाडीट करणार आहोत. पुण्यात मेट्रो आली. त्यासाठी हजारो कोटी रुपये उधळले. त्या ऐवजी बसेसची सुधारल्या करता आल्या असता.
नागपूरमध्ये मेट्रोत वाढदिवस साजरे होतात. ती मेट्रो लॅासमध्ये आहे. या सरकारच्या काळात शाळा कमी आणि दारुची दुकानं वाढली आहेत, असं म्हणत त्यांनी हल्लाबोल केला.
बॅनरवरील फोटोंबाबतही सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं. मी बॅनरच्या विरोधात आहे. अनधिकृत बॅनर लावू नये, असा निर्णय घ्यायला हवा, असं त्या म्हणाल्या. आता या सरकारमध्ये यशवंतराव चव्हाण यांचा फोटो मोठा होत आहे.
हेडगेवार यांना बाजूला ठेवून यशवंतराव चव्हाण यांचा विचार मांडला जातोय. पण अजून मोठी मजल मारायची आहे, असं त्या म्हणाल्या.
शरद पवार दसऱ्या दिवशी सभा घेणार तर उपमुख्यमंत्री अजित पवार दसऱ्यानंतर करणार राज्यव्यापी दौरा आम्ही ५ दिवसांच्या अधिवेशनासाठी गेलो.
पहिल्या दिवशी जुनी इमारत सोडली, दुसऱ्या दिवशी नव्या इमारतीत गेलो आणि तिसऱ्या दिवशी महिला आरक्षणाचा विधेयक मांडलं.पण, जनगणना होईल,
डिलिमेटेशन होईल आणि त्यानंतर आरक्षण देण्यात येईल. यासाठी २०२७ उजाडले. एक दिवस अधिवेशन चालवायला ५ कोटी लागतात. त्यांनी २५ कोटी रुपये खर्च केले, असं म्हणत त्यांनी टीका केली.