

अधिक महिन्याच्या पहिल्याच दिवशी जेजुरीच्या खंडोबा देवाच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी
आज पासून अधिक महिन्याला सुरुवात झाली असून रविवार आणि अधिक महिना या निम्मित महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या दर्शनासाठी आणि कुलधर्म कुलाचार नुसार धार्मिक विधी करण्यासाठी राज्याच्या विविध भागातून भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
उन्हाळ्यातील रखरखते उन्हाची पर्वा न करता मोठ्या संख्येने भाविक जेजुरी गडावर आले होते.
जेजुरीच्या श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने भाविकांसाठी सावली, पाणी, सुलभ दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे.