आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाकडून सहा नवे चेहरे

Photo of author

By Sandhya

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागल्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी या पक्षाकडून सहा नवे चेहरे मैदानात उतरवले जाणार आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध मुलगा पार्थ किंवा पत्नी सुनेत्रा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा विचारही अजित पवार करीत असल्याचे वृत्त आहे.

विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पार्थ किंवा सुनेत्रा अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार सतीश चव्हाण आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांना लोकसभेच्या मैदानात उतरविले जाण्याची शक्यता आहे.

शिरूरमध्ये अजित पवार गटाने सहकारमंत्री वळसे-पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना पसंती दिली आहे. वळसे यांनी नकार दिल्यास आढळरावांना आखाड्यात उतरविले जाणार आहे.

शरद पवारांचा सातारा हा किल्ला भेदण्यासाठी अजित पवार गटाने रामराजे नाईक-निंबाळकर यांना पसंती दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार सतीश चव्हाण यांना तयारी करण्याच्या सूचनाही पक्षाने दिल्याचे समजते.

Leave a Comment