आमदार गोपीचंद पडळकर यांची धनगर आरक्षणासाठी जागर यात्रा

Photo of author

By Sandhya

आमदार गोपीचंद पडळकर

मी पहिला धनगर आहे आणि मगच मी गोपीचंद पडळकर असे सांगत परत एकदा धनगर आरक्षणाचा जागर करायला संपूर्ण महाराष्ट्रात धनगर जागर यात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.

यात्रेचा पहिला टप्पा १२ ते १७ ऑक्टोबर दरम्यान केला जाईल. १२ ऑक्टोबररोजी मराठवाडा, १३ ऑक्टोबररोजी उत्तर महाराष्ट्र, १४ ऑक्टोबररोजी विदर्भ, १६ ऑक्टोबररोजी पश्चिम महाराष्ट्र आणि १७ ऑक्टोबररोजी कोकण भागात ही यात्रा काढली जाणार आहे.

तसेच धनगर जागर यात्रेच्या माध्यमातून आरक्षणाचा आणि हक्काचा लढा यशस्वी करण्यासाठी सर्व समाज बांधवांनी यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार पडळकर यांनी यावेळी केले.

याबाबत आमदार पडळकर म्हणाले, धनगर आरक्षणासाठी उभारलेल्या आंदोलनास राज्यातून प्रचंड प्रतिसाद लाभला होता. संपूर्ण समाज एकवटला होता.

कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून धनगर बांधवांना आरक्षण देण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. या आंदोलनानंतर आज अखेर प्रत्यक्ष धनगर समाज बांधवांना आरक्षण मिळाले नाही.

त्यामुळे आरक्षणाचा हक्क न्यायालयीन मार्गाने मिळविल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. तुम्हा सर्वांच्या साथीनं हा लढा मी लढणार आहे आणि यशस्वी देखील करून दाखवणार आहे, असेही पडळकर म्हणाले.

Leave a Comment