नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी काँग्रेसचा मेळावा

Photo of author

By Sandhya

नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी

सरकारी अनास्था व वैद्यकीय असुविधांमुळे राज्यातील शासकीय रुग्णालयांत सुमारे १०० लोकांचे नाहक मृत्यू झाले. त्यात नवजात बालकांचाही समावेश आहे.

या मृत्यूबाबत सरकार गंभीर नाही. या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन राज्यातील सरकार बरखास्त करावे, अशी मागणी काँग्रेसने गुरुवारी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली.

नांदेड, छत्रपती संभाजीनगर व नागपूरच्या शासकीय रुग्णालयांत दगावलेल्यांच्या जवळच्या नातेवाईकांना सरकारने तातडीने १० लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

तर हे मृत्यू म्हणजे राज्य सरकारचे अपयश असून वैद्यकीय शिक्षण मंत्री व सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांचे राजीनामे घेण्याची विनंती राज्यपालांना करण्यात आल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

Leave a Comment