अबकी बार पुन्हा एकदा मोदी सरकार : अमित शहांचा विश्वास

Photo of author

By Sandhya

आसाममधील दिब्रुगडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आगामी लोकसभा निवडणुक २०२४ संदर्भात मोठा दावा केला आहे. आसाममध्ये बोलताना ते म्हणाले, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आसाममध्ये १४ पैकी १२ जागा जिंकेल.

देशात भाजप ३०० हून अधिक जागा जिंकत मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, असा विश्वास गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. भाजपच्या दिब्रुगड कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

या वेळी अमित शहा म्हणाले, भाजप हा संघटनेच्या जोरावर चालणारा पक्ष आहे. नुकत्‍याच ईशान्य भारतातील ३ राज्यांमध्ये निवडणुका झाल्या. तिन्ही राज्यांमधील सरकारमध्‍ये भाजप आहे. ईशान्येतील सात राज्यांमध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार आहे. त्यामुळेच ईशान्येचा विकास झाला आहे, असेही शहा यावेळी म्‍हणाले.

Leave a Comment