आदित्‍य ठाकरे : “भाजपचे नेते कोणत्या तोंडाने महिलांकडे मते मागतात? हीच ती भाजप…”

Photo of author

By Sandhya

आदित्‍य ठाकरे

भाजपचे नेते कोणत्या तोंडाने महिलांकडे मते मागतात? हीच ती भाजप आहे, ज्यांनी रेवण्णासारख्या राक्षसाचा प्रचार केला होता. त्या रेवण्णाने जवळपास अडीच हजार महिलांवर अत्याचार केला, त्यांच्यावर बलात्कार केला. तसेच गेल्या दोन वर्षांमध्ये भाजपला महाराष्ट्राचा विसर पडला होता. आता त्यांना लाडकी बहीण आणि लाडके भाऊ आठवत आहेत.

पण गेल्या दोन वर्षांत तरुण तरुणी बेरोजगार म्हणून रस्त्यावर फिरत होते, तेव्हा त्यांना हे दिसले नाही, असा सवाल करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला.

नाशिकमध्ये प्रचार सभेला ते संबोधित करत होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. आदित्य ठाकरे म्हणाले, एकनाथ शिंदेंनी गौरी लंकेश या महिला पत्रकाराच्या खुन्यांना स्वतःच्या पक्षात घेतलेले आहे, अशा एकनाथ शिंदेंना तुम्ही मतदान कराल का? याच भाजपने बिलकीस बानोवर बलात्कार झाला होता.

तिच्या आरोपींना सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करून त्यांना तुरुंगातून बाहेर काढत, त्यांची आरती ओवाळली होती आणि त्यांना प्रचारात फिरवलेले आहे. सध्या महाराष्ट्रात ड्रग्स, स्क्रॅपचे माफिया फिरत आहेत.

पण ज्या राज्यात तुम्ही उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसून, गद्दारी करून भाजपसोबत सरकार स्थापन केले. भाजपवाले किंवा एकनाथ शिंदे गँगवाले हे पळून जातात, लपतात. समोर येऊन यावर उत्तरे देत नाहीत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी महायुतीवर केली.

Leave a Comment

You cannot copy content of this page