आदित्य ठाकरे : महामार्गावरील टोलवसुली बंद करा

Photo of author

By Sandhya

महामार्गावरील टोलवसुली बंद करा

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम या दोन महामार्गाची देखभाल महापालिकेकडून होते. मग टोल वसुली का केली जात आहे. मुंबईकरांवर दुप्पट कर कशासाठी लावला जात आहे.

मुंबईतील हे दोन टोलनाके बंद करा, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज (दि. ७) केली. मातोश्रीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ठाकरे म्हणाले की, मुंबईतील पूर्व आणि पश्चिम या दोन महामार्गावरील टोलचे पैसे एमएसआरडीसीकडे का दिले जात आहेत ? सुमारे २ हजार कोटी रूपये दिले आहेत.

त्यामुळे टोल बंद होईपर्यंत हा निधी बीएमसीला द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. मुंबईतील दोन महामार्ग बीएमसीला दिले आहेत. मग टोल वसुली का केली जात आहे.

त्यामुळे हे टोल बंद करा, अशी मागणी करून आमचे सरकार आल्यानंतर हे टोल बंद केले जातील, असे ठाकरे यांनी सांगितले. 

Leave a Comment