BIG NEWS : उद्धव ठाकरे मनसे प्रमुख राज ठाकरेंशी चर्चा करणार… ; महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप

Photo of author

By Sandhya

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप

महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता एकत्र यावे, अशी मागणी शिवसैनिक आणि मनसैनिक गेल्या काही दिवसांपासून करू लागले आहेत.

या मागणीबाबतचे फलकही त्यांच्याकडून ठिकठिकाणी लावले गेले होते. तर, सोशल मीडियावर देखील अनेक पोस्ट व्हायरल करण्यात केल्या जातात.

मात्र, अश्यातच एक मोठी बातमी समोर आली असून, यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात चर्चा करण्यास तयार असल्याचे खासगीत म्हटले आहे.

तसेच, एका प्रसिद्धीवृत्तवाहिनीने देखील या बातमीला दुजोरा दिला आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “मी राज ठाकरे यांना फोन करण्यास तयार आहे आणि वेळ आल्यास राज ठाकरे यांच्यासह बोलणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे’.

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी महापालिका निवडणुकांपासून ते लोकसभा निवडणुकांपर्यंत कोणती सूतं जुळताय का? हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Comment