अजित पवार आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर ; मराठा समाजाकडून विरोध, गोंधळ होण्याची शक्यता

Photo of author

By Sandhya

अजित पवार आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर

महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. मात्र त्यांच्या या दौऱ्याला मराठा समाजाकडून विरोध करण्यात आला आहे.

गंगापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या 43 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उ‌द्घाटन पवार यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, मराठवाडा साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमास अजित पवारांसह सर्वच राजकीय नेत्यांना मराठा आंदोलकांनी विरोध केला आहे. याबाबत, गंगापूर तहसीलदार यांना मराठा आंदोलकांनी निवेदन देण्यात आले आहे.

अजित पवार हे सकाळी 10 वाजता हेलिकॉप्टरने दाखल होतील. त्यानंतर ते दोन ठिकाणी खाजगी कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. दुपारी तीनच्या सुमारास संभाजीनगर जिल्ह्याची आढाव बैठक घेणार आहेत. मात्र अजित पवार यांच्या या दौऱ्याला विरोध करत मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

काय म्हटले निवेदनात? आमचा साहित्य संमेलनास विरोध नसून त्या ठिकाणी संमेलनाच्या आडून काही राजकीय मंडळी स्वतः चा प्रचार करून घेत असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या तीन महिन्यापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आसताना शासनाने अजून ही मराठा समाजाला OBCमधून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास तयार नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने संविधानिक पदावर असलेल्या राजकीय पुढाऱ्यांनी जनतेत येऊ नये अशी घोषणा केली आहे.

असे असताना संत परंपरेत ज्ञानेश्वर रचिला पाया, तुका झालासे कळस असे उत्तुंग साहित्य परंपरा प्रचार जे संत महंत मंडळी रात्रंदिवस करतात त्यांना बोलावणे अपेक्षित होते.

मात्र तसे न करता कोणीतरी आपल्या राजकीय पदाचा गैरवापर करून प्रचारासाठी साहित्य संमेलनाच्या वापर करत असेल तर आमचा सकल मराठा समाजाचा यास विरोध असून,

शांततेत लोकशाही मार्गाने आम्ही राजकीय पुढाऱ्यांना विरोध करणार आहोत तरी प्रशासनाने कायदा सुव्यवस्थेचा विचार करता राजकीय मंडळीना त्या ठिकाणी येण्यास प्रतिबंध करावा अन्यथा होणाऱ्या परिणामास प्रशासन व प्रशासकीय अधिकारी जवाबदार असतील याची नोंद घ्यावी.

Leave a Comment