अजित पवारांचा गौप्यस्फोट ; बारामतीसह 4 लोकसभा लढवणार!

Photo of author

By Sandhya

अजित पवारांचा गौप्यस्फोट

अजित पवार गटाच्यावतीने दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिराला अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करत आहेत. या शिबिरामध्ये आजी-माजी आमदार खासदार आणि राज्यातले सर्व जिल्हाध्यक्षांना निमंत्रित करण्यात आलं आहे.

शिबिराच्या माध्यमातून आगामी निवडणुकांची तयारी करण्यात येणार आहे. आज या शिबिराचा शेवटचा दिवस आहे. या शिबिरात बोलताना अजित पवारांनी आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

यावेळी बोलताना अजित पवारांनी कोणकोणत्या जागा लढवणार या बाबतची माहिती दिली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून निवडून आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न आणि काम करायचे आहे. महाराष्ट्रातून जास्तीत जास्त ४८ पैकी जास्तीत जास्त NDA च्या विचाराचे खासदार निवडणून आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत असं अजित पवार यावेळी बोलताना म्हणालेत.

तर आपल्याकडे असणाऱ्या बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या चार जागा तर आपण लढवणारच आहोत. याशिवाय ठाकरे गटाच्याही काही जागा लढवणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

महायुतीत लोकसभेच्या चार जागा अजित पवार गट लढवणार असल्याचे आज अजित पवार यांनी कर्जतमध्ये आयोजित केलेल्या शिबिरात जाहीर केले आहे. बारामती, शिरूर, सातारा, रायगड सध्या राष्ट्रवादीकडे लोकसभेच्या या चार जागा आहेत.

त्याचबरोबर ठाकरे गटाकडे ज्या जागा आहेत, त्यापैकी ज्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद असेल तर तिथं भाजप आणि शिंदे साहेबांशी चर्चा करून आपल्याला जागा वाटप करता येईल” असं अजित पवार म्हणाले

बारामती, शिरूर, सातारा, रायगड या जागा आपण निवडणार आहोत. इतर जागांसंदर्भात आपण शिंदे, फडणवीसांशी चर्चा करून लवकरच निर्णय जाहीर करू. जागावाटपासंदर्भात या सगळ्यांशी प्राथमिक चर्चा झाली आहे.

आपल्या कार्यकर्त्याची ताकद पाहून आपण त्यांची निवड करणार आहोत परंतु इतर ज्या जागा आहेत त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आहेत त्याच्यात पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद असेल तर तिथं भाजप आणि शिंदे साहेबांशी चर्चा करून आपल्याला जागा वाटप करता येईल” असं अजित पवार म्हणाले

Leave a Comment