
कोणत्या पक्षाने कुठे जावं हे त्या स्वतंत्र पक्षाला अधिकार आहेत असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केले. संघ स्मृती मंदिर भेटीत गैरहजर राहिल्याबाबत एका प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते.
अधिवेशनात महाराष्ट्राच्या हिताचाच निर्णय निघेल असे सर्वांनाच वाटत आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे ही प्रामाणिक भूमिका आहे. तीच भूमिका छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांची पण आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. २४ तारखेपर्यंत वाट पाहण्याची गरज लागणार नाही. त्याआधीच हे सरकार मराठा समाजाला न्याय देईल असा विश्वास आहे.
दरम्यान, जातीय जनगणना ही झालीच पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जातीय जनगणना झाली तर कोणाची किती भागीदारी आहे. त्याप्रमाणे आरक्षणाचा तिढा सुटेल यावर मिटकरी यांनी भर दिला.
उद्धव ठाकरे यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत, परंतु महत्त्वाच्या गोष्टी प्रकट करत नसतात, असा एक राजशिष्टाचार आहे. उद्धव ठाकरेंनी केलेला संवाद आपुलकीचा संवाद होता असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.