Angry protest against attempted rape of minor girl at Parvati Paitha

Photo of author

By Sandhya

पर्वती पायथा येथे अल्पवयीन चिमुरडीवरील अत्याचाराच्या प्रयत्ना विरोधात संतप्त आंदोलन
आज पर्वती पायथा परिसरात एका अवघ्या नऊ वर्षांच्या चिमुरडीवर तिच्याच सख्ख्या आजोबांनी अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याच्या धक्कादायक घटनेच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात आले. या अमानुष आणि संतापजनक घटने विरोधात स्थानिक महिलांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोपीच्या प्रतीकात्मक तिरडीचे आंदोलन करत निषेध नोंदवला.
या आंदोलनादरम्यान आरोपीच्या प्रतीकात्मक तिरडीला चपला मारत परिसरात फिरवण्यात आले. “अशा नराधमांना समाजात जागा नाही”, “लहान मुलींवरील अत्याचार थांबवा”, “महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कारवाई करा” अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी घटनेच्या परिसरातील अनेक स्थानिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आंदोलनात माननीय रूपाली पाटील, सामाजिक कार्यकर्त्या संगीता तिवारी, प्रिया सूर्यवंशी यांनी सहभाग घेत पीडितेला न्याय मिळवून देण्याची ठाम भूमिका मांडली.
या संपूर्ण आंदोलनाचे नियोजन व आयोजन भारती लोंढे यांनी केले होते. उपस्थित महिलांनी प्रशासनाकडे आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, अल्पवयीन मुलींवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांबाबत तीव्र संताप व्यक्त केला.
“आज जर अशा विकृत प्रवृत्तीविरोधात समाज रस्त्यावर उतरला नाही, तर उद्या प्रत्येक घरातील मुलगी असुरक्षित होईल. अशा नराधमांना तात्काळ कठोर शिक्षा झालीच पाहिजे,” अशी भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली

Leave a Comment

You cannot copy content of this page