बांधकाम सुरू असलेला रेल्वे पूल कोसळून 17 कामगारांचा मृत्यू…

Photo of author

By Sandhya

 बांधकाम सुरू असलेला एक रेल्वे पूल कोसळून किमान 17 कामगारांचा मृत्यू

मिझोराममध्ये बांधकाम सुरू असलेला एक रेल्वे पूल कोसळून किमान 17 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तिथे काम करणाऱ्या अधिकार्‍यांच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

मिझोरमची राजधानी आयजोल पासून 21 किमी अंतरावर असलेल्या सायरंगमध्ये आज सकाळी 10 वाजता हा अपघात झाला. घटनेच्या वेळी पुलावर 35 ते 40 मजूर काम करत होते. त्यातील 17 कामगारांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

बैराबी ते सायरंग जोडणाऱ्या कुरुंग नदीवर हा पूल बांधला जात होता. प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे. तिसऱ्या आणि चौथ्या खांबामधील गर्डर 341 फूट पडला. पुलामध्ये एकूण 4 खांब आहेत.

तिसऱ्या आणि चौथ्या खांबामधला गर्डर खाली पडल्याने हा अपघात झाला. या गर्डरनर हे सर्व मजूर काम करत होते. जमिनीपासून पुलाची उंची 104 मीटर म्हणजेच 341 फूट आहे. म्हणजेच पुलाची उंची कुतुबमिनारपेक्षा जास्त आहे.

Leave a Comment