भाजप खासदाराच्या घरात आढळला तरुणाचा मृतदेह; डोक्याला गोळी लागून तरुणाचा मृत्यू

Photo of author

By Sandhya

भाजप खासदाराच्या घरात आढळला तरुणाचा मृतदेह

भाजपचे लखनऊचे खासदार आणि केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांच्या घरात एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. संबंधित तरुणाच्या डोक्याला गोळी लागून त्याचा मृत्यू झाला समोर आली आहे.

घटनास्थळी खासदार कौशल किशोर यांचा मुलगा विकास किशोर यांची बंदूक आढळली आहे. पोलिसांनी बंदूक जप्त केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

केंद्रीय मंत्र्याच्या घरात एखाद्या तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात गोंधळ उडाला आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, विनय श्रीवास्तव असे गोळी लागून मृत्युमुखी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

संबंधित तरुण मंत्री कौशल किशोर यांचा मुलगा विकास किशोर यांचा मित्र असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

लखनऊचे डीसीपी राहुल राज यांनी या घटनेची अधिक माहिती देताना, ‘विनय श्रीवास्तव नावाच्या तरुणाचा गोळी लागल्याने मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री एकूण सहाजण केंद्रीय मंत्र्यांच्या घरात आले होते.

रात्री सर्वांनी एकत्रित जेवण केलं. यानंतर ही घटना घडली. ही घटना घडल्यानंतर आम्ही घटनास्थळावरून एक बंदूक जप्त केली आहे. ही बंदूक विकास किशोर यांची असल्याचं समजत आहे.

आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहेत. फॉरेन्सिक टीम नमुने गोळा करत आहे. आम्हीही सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहोत.’ असे म्हटले आहे.

Leave a Comment