
‘टु व्हील्स ऑफ होप’ उपक्रमांतर्गत १००० विद्यार्थिनींना सायकल वाटप!
मुलींच्या शिक्षणाला चालना देत त्यांच्या शाळेत जाण्याचा प्रवास अधिक सुलभ व सुरक्षित व्हावा या उद्देशाने मा. शालेय शिक्षणमंत्री ना. दादाजी भुसे यांच्या हस्ते ‘टु व्हील्स ऑफ होप’ उपक्रमांतर्गत इयत्ता ८ वीतील १००० विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमासाठी ना. दादाजी भुसे यांनी विशेष पुढाकार घेत HDFC Bank यांच्या CSR निधीतून ही योजना राबविण्यात आली.
मालेगाव तालुक्यातील ८५ जिल्हा परिषद व अनुदानित शाळांमधील दोन किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरून येणाऱ्या विद्यार्थिनींना या सायकलींचा लाभ देण्यात आला. तसेच यावेळी UPSC व MPSC परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार आणि पोद्दार फाऊंडेशन, नाशिक यांच्या मार्फत शाळांना डिजिटल शैक्षणिक साहित्याचेही वाटप करण्यात आले.
यावेळी ना. दादाजी भुसे यांनी CSR निधीतून १००० सायकली उपलब्ध करून दिल्याबद्दल HDFC Bank व मा. उपमुख्यमंत्री महोदया यांचे सहसचिव डॉ. संतोष भोसले यांचे आभार मानले.
NDA मध्ये निवड झालेल्या कु. जिया करपे व कु. समृद्धी इंगळे यांचे तसेच आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनीताई भोकनळ यांचे अभिनंदन करण्यात आले. ‘निपुण महाराष्ट्र अभियान’ अंतर्गत नाशिक जिल्ह्यात १११३ सुपर निपुण शाळा झाल्याचा उल्लेख करण्यात आला.
विद्यार्थिनींनी सायकलींचा योग्य वापर करून शिक्षणात प्रगती साधावी व शाळांनी त्यांचे जतन करून अधिकाधिक लाभ द्यावा, असे आवाहन ना. दादाजी भुसे यांच्या वतीने करण्यात आले.
यावेळी शिक्षण विभागाचे अधिकारी, HDFC बँकेचे अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, शिवसेना पदाधिकारी, जि. प. शालेय विद्यार्थी, शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.