अजित पवार हा माझा पुतण्या आहे. त्यामुळे कुटुंबातील व्यक्तीना वडिलमाणसाला भेटणे यात गैर काय गैर काय, असा सवाल करत आम्ही कधीच भाजपबराेबर जाणार नाही, असा खुलासा शरद पवार यांनी आज माध्यमांशी बाेलताना केला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शनिवारी भेट झाली हाेती. या भेटीवरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. आज सोलापूर दौऱ्यात माध्यमांशी बाेलताना शरद पवार यांनी या भेटीबाबत खुलासा केला.
ते म्हणाले की, अजित पवार हा माझा पुतण्या आहे. त्यामुळे कुटुंबातील व्यक्तीनं वडिलमाणसाला भेटणे यात गैर काय. अजित पवार आणि माझी गुप्त बैठक झालेली नाही.
भाजपसाेबत जाणार नाही राष्ट्रवादी पक्ष भाजपसोबत जाणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. भाजपकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे.
पुढील रणनितीसाठी इंडिया आघाडीची बैठक घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सीमाभागातील प्रश्नांवर गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे असेही त्यांनी नमूद केले.