PUNE : पानशेत धरण शंभर टक्के भरले

Photo of author

By Sandhya

PUNE : पानशेत धरण शंभर टक्के भरले

गेल्या तीन दिवसांपासून पानशेत-वरसगाव खोर्‍यातील पावसाचा जोर ओसरल्याने धरणसाखळीत पाणीसाठ्याची वाढ मंदावली आहे. शनिवारी सायंकाळी पाचपर्यंत खडकवासला प्रकल्पात एकूण 26.37 टीएमसी (90.47 टक्के) इतका पाणीसाठा झाला होता.

पानशेत धरण जवळपास शंभर टक्के भरले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणसाखळीत दीड टीएमसी पाणी कमी आहे. गेल्या वर्षी 12 ऑगस्ट रोजी धरणसाखळीत 27.77 टीएमसी (96.03 टक्के) इतका पाणीसाठा होता.

तीन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला होता. जोरदार पाऊस पडणार्‍या रायगड जिल्ह्यालगतच्या दापसरे, तव दासवे, शिरकोली भागांतही पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे धरणांतील पाणीसाठ्याची वाढ मंदावली आहे.

शनिवारी सकाळी सहा ते सायंकाळी पाचपर्यंत टेमघर येथे 10 मिलीमीटर, वरसगाव व पानशेत येथे प्रत्येकी 3 मिलीमीटर पाऊस पडला. तर खडकवासला धरण परिसरात पावसाची नोंद झाली नाही. खडकवासला, सिंहगड भागातही पावसाने उघडीप दिली आहे.

Leave a Comment