BIG NEWS : राष्ट्रवादीचे दोन्ही गट पाच राज्यातील विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत

Photo of author

By Sandhya

राष्ट्रवादीचे दोन्ही गट पाच राज्यातील विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी पक्षावर अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटाकडून दावा सांगितला जात आहे.

हे दोन्ही गट आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूकीच्या तयारीला देखील लागले आहेत. यादरम्यान देशातील आगामी पाच राज्यातील विधानसभा निवडणूकीबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट (अजित पवार गट आणि शरद पवार गट) हे या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका लढवणार नाहीत, निवडणूक चिन्हाबद्दलची लढाई केंद्रीय निवडणूक आयोगात सुरू असताना दोन्ही गटांनी याबद्दलचा निर्णय घेतला आहे. याबद्दलचे वृत्त साम टीव्हीने दिले आहे.

या दरम्यान अजितदादा गटाच्या वर्किंग कमिटीची लवकरच दिल्लीत बैठक होणार असून निवडणूक चिन्ह लढाईच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत ही बैठक होणार आहे. या बैठकीची तारीख लवकरच निश्चित होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Leave a Comment