संजय राऊत यांचा मोठा खुलासा; म्हणून आम्ही इंडिया आघाडीची स्थापना केली…

Photo of author

By Sandhya

संजय राऊत यांचा मोठा खुलासा

विरोधकांनी एकत्र येऊन निवडणूक लढवण्यासाठीच इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली आहे असे ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

ज्या राज्यांत कॉंग्रेसची स्थिती कमकुवत आहे त्या राज्यांतील जागा वाटपांबाबत कॉंग्रेसने चर्चा सुरू केली पाहिजे अशी सुचनाही त्यांनी केली आहे. राऊत यांनी बुधवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितले, आम्ही सर्व आगामी लोकसभा निवडणूक एकजुटीने लढवू.

परंतु राष्ट्रीय स्तरावर अखिलेश यादव यांच्या पक्षासारखे मोठे पक्ष मोठे पक्ष आहेत. त्याचप्रमाणे, इतर प्रादेशिक पक्ष आहेत, ज्यांचे राष्ट्रीय स्तरावर मोठे अस्तित्व आहे,” असे ते म्हणाले.

कॉंग्रेसने ज्या राज्यात त्यांचे फार मोठे अस्तित्व नाही तेथे जागावाटपासाठी चर्चा सुरू करावी अशी सुचनाही त्यांनी केली. मंगळवारी मध्य प्रदेशातील इंडिया आघाडीतील जागावाटपाबाबत पत्रकारांशी बोलताना अखिलेश यादव म्हणाले होते की, आघाडीत कोणाला किती जागा मिळतील याचे उत्तर कॉंग्रेस पक्ष देईल.

त्यांच्या या विधानावर बोलताना राऊत यांनी ही प्रतिक्रीया दिली. अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका स्थानिक पातळीवर होतात त्यामुळे तेथील स्थानिक जागांनुसार जागावाटप केले जाईल, इंडिया आघाडीमध्ये, यावर चर्चा होते.

राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये कॉंग्रेस हा मोठा पक्ष आहे. त्यामुळे त्यांना कोणाला सोबत घ्यायचे आहे ते ते ठरवतील,” असे राऊत यांनी सांगितले.

दरम्यान इंडिया आघाडीतील घटक पक्षांची जागा वाटपाची चर्चा सध्या विधानसभा निवडणूकांमुळे थंडावली आहे. त्यामुळे आघाडीतील काही घटक पक्षांमध्ये काहीशी अस्वस्थता आहे असे सांगितले जात आहे.

Leave a Comment