BIG NEWS : राऊतांकडून मकाऊ कसिनोतील व्हिडिओ शेअर; पिक्चर अभी बाकी है…

Photo of author

By Sandhya

राऊतांकडून मकाऊ कसिनोतील व्हिडिओ शेअर

मकाऊ की रातें..पिक्चर अभी बाकी है.. अशी एक्स अकाऊंटवर कॅप्शन लिहित खासदार संजय राऊत यांनी मकाऊ कसिनोतील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे.

पिक्चर अभी बाकी है, असा इशारा राऊत यांनी बावनकुळेंना दिला. राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊतील कसिनो खेळत असल्याचा कथित फोटो शेअर केला होता.

आता राऊतांनी मकाऊतील कसिनोचा आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी हा व्हिडिओ एक्स अकाऊंटवर शेअर करत मकाऊ की रातें..पिक्चर अभी बाकी है…अशी कॅप्शन लिहिली.

राऊत यांनी ६ सेकंदाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये एक कसिनो दिसत आहे. कसिनोत बसलेली माणसे कॅमेऱ्यात दूरवरून दिसत आहेत. पण, फार स्पष्ट असे या व्हिडिओमध्ये दिसत नाही.

Leave a Comment