मध्य रेल्वेच्या लोणावळा-पुणे विभागात खडकी-शिवाजीनगरदरम्यान विविध कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे शनिवार-रविवार दोन दिवस मुंबई ते पुणेदरम्यान नियमितपणे धावणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेससह अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार लोणावळा येथील खडकी-शिवाजीनगरदरम्यान २२ नोव्हेंबर २०२३ ते २६ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग काम, मिलिटरी यार्डचे इंटरलॉकिंग आणि ऑटोमॅटिक सिग्नलिंग काम करण्यात येणार आहे.
या कामामुळे मुंबई ते पुणे धावणाऱ्या अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्या गाड्या रद्द केल्या आहेत; तर काही गाड्या वेगळ्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत.
२५ नोव्हेंबर २०२३ रोजी ट्रेन क्रमांक १२१२३ सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन, सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्स्प्रेस रद्द असणार आहे. २६ डिसेंबर २०२३ रोजी सीएसएमटी-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस, सीएसएमटी-पुणे डेक्कन एक्स्प्रेस, सीएसएमटी-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस रद्द असणार आहे.
या गाड्यांना विलंब शनिवारी काही गाड्यांना विलंब होणार आहे. ट्रेन क्रमांक ११३०२ बेंगळूरु -सीएसएमटी उद्यान एक्स्प्रेस सोलापूर विभागात २ तास ४० मिनिटे उशिराने नियमित केली जाईल. ट्रेन क्रमांक १६५०६ बेंगळूरु-गांधीधाम एक्स्प्रेस पुणे-सातारा विभागात एक तासानंतर नियमित केली जाईल. रविवारी ट्रेन क्रमांक २२१५९ सीएसएमटी-चेन्नई एक्स्प्रेस मुंबई विभागात अडीच तासांनंतर नियमित केली जाईल.