Big news : ठाणे आज बंद ; जालन्यातील लाठीचार्ज प्रकरणाचे पडसाद

Photo of author

By Sandhya

ठाणे आज बंद; जालन्यातील लाठीचार्ज प्रकरणाचे पडसाद

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे गेल्या आठवड्यात आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेचे राज्य भरात पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. त्या घटनेच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आला.

यातच आता सकल मराठा मोर्चाच्या वतीने सोमवारी आज 11 सप्टेंबर रोजी ‘ठाणे बंद’ पुकारण्यात आला आहे. या बंदला सर्व मराठा संघटना व सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला. बंदची हाक आज देण्यात आल्याने ठाण्यात पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे.

बंददरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठाणे पोलिसांकडून शहरात बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही ठाण्यात निवासस्थान आहे.

येथेही पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. रॅली, रास्ता रोको न करता अहिंसक मार्गाने बंद यशस्वी करण्याचा निर्धार मराठा समाजातील समन्वयकांनी केला आहे.

हक्काच्या लढाईत सहभागी व्हावे, असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी करताच दोन दिवसांपूर्वी प्रमुख सर्वपक्षीय नेते व मराठा संघटनांनी मोर्चाला पाठिंबा दिला.

दरम्यान, कोणत्याही स्वरूपात बंद काळात हिंसा केली जाणार नसून नागरिकांनाही शांततेच्या मार्गाने बंदमध्ये सहभागी होण्याची विनंती केली जाणार असल्याचे भारतीय मराठा महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महेश कदम यांनी सांगितले.

याशिवाय सरकारी व खासगी कार्यालय सुरू असल्याने नोकरदारांना सेवा देण्यासाठी ठाणे परिवहन सेवा सुरू ठेवली जाणार आहे. नागरिकांना गैरसोय होणार नाही, याची दक्षता यावेळी घेतली जाणार असल्याचे म्हंटले जात आहे.  

Leave a Comment