धक्कादायक..! सहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

Photo of author

By Sandhya

 सहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

नागभिड तालुक्यात सहा वर्षीय चिमुरडीवर एका ५२ वर्षीय इसमाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नागभीड पोलिसांनी संशयित आरोपीस अटक केली आहे.

सुधाकर महादेव निमगडे असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिलीच्या वर्गात शिकणारी पिडित मुलगी रविवारी (दि.११) आई-वडील शेतावर गेल्यामुळे घरी एकटीच होती.

त्यावेळी संशयित सुधाकर निमगडे याने पीडित मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून मोटारसायकलवरून गावातील चौकात असलेल्या दुकानात नेले.

त्याचे आणि पिडित मुलीच्या कुटुंबाचे संबंध चांगले असल्यामुळे ती त्याच्यासोबत दुकानात गेली. दुकानातून चॉकलेट घेतल्यानंतर संशयित आरोपी मुलीला तिच्या घरी सोडण्यासाठी गेला. घरी कोणी नसल्याची संधी साधून त्याने चिमुकलीवर अत्याचार केला.

Leave a Comment