छगन भुजबळ : भुजबळला पाडायचं सोडा, भुजबळ किती जणांना पाडेल त्याचा हिशोब राहू द्या…

Photo of author

By Sandhya

छगन भुजबळ

ओबीसी आरक्षणासाठी छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष राज्यात अधिक तीव्र होतो की काय अशी चिन्ह आहे.

छगन भुजबळ व मनोज जरांगे पाटील यांच्यात चांगलेच शाब्दिक युद्द त्यावरुन रंगले आहे. यात छगन भुजबळांना मराठा मतदार येवला मतदारसंघात पुन्हा निवडून येऊ देणार नाही. त्यांना निवडणूकीत पाडले जाईल अशीही चर्चा आहे. त्यावर छगन भुजबळ यांनी आपली सडेतोड भूमिका स्पष्ट केली आहे.

छगन भुजबळला मंत्रिपदाची व आमदारकीची परवा नाही. भुजबळला पाडायचं सोडा, भुजबळ किती जणांना पाडेल त्याचा हिशोब राहू द्या असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला. मंत्रिपद, आमदारकी गेली तरी चालेल पण ओबीसी समाजासाठी लढणार असे  छगन भुजबळ म्हणाले.

काल जालना येथील सभेनंतर आज नाशिकच्या इगतपुरी येथे शेतकरी मेळाव्यात त्यांनी जरांगे पाटील यांचा पुन्हा समाचार घेतला. भुजबळ म्हणाले दादागिरी करु नका, गावागावात नेत्यांना प्रवेश बंदी करायला महाराष्ट्र तुमच्या सातबारावर नाही. या देशात संचार स्वातंत्र्य आहे, कुणी कुठेही जाऊ येऊ शकतो.

तुम्ही कुणाला अशाप्रकारे अडवू शकत नाही.  अन्याय सहन करु नका असे आवाहन त्यांना ओबीसी बांधवांना केले. यावेळी भुजबळांनी संभाजी राजेंवरही निशाणा साधला.

भुजबळ म्हणाले, संभाजीराजे तुम्ही एका समाजाची बाजू घेऊ नका, तुम्ही राजे आहात, सगळ्यांना न्याय द्या. आमची भूमिका समजून घ्या. आम्ही चुकलो तर आम्हाला सांगा ते चुकत असतील तर त्यांना सांगा. तसेच आरक्षणाच्या प्रश्नात तुम्ही पडूच नका असा सल्लाच भुजबळांनी राजेंना दिला.

Leave a Comment