निघोजे येथे चाकूचा धाक दाखवून लुटणा-या तरुणास अटक

Photo of author

By Sandhya

चाकूचा धाक दाखवून लुटणा-या भामट्यास महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. चाकण औद्योगिक वसाहतीतील निघोजे ( ता. खेड ) गावच्या हद्दीतील महिंद्रा सर्कल ते निघोजे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोमवारी ( दि. ३ ) ही घटना घडली.

गुलाब अब्दुल गफार ( वय – २५, रा. गणेश नगर, तळवडे,) असे अटक करण्यात आलेल्या भामट्याचे नाव आहे. ललीत दिलीप सोनवणे ( वय – २२, रा. निघोजे, ता. खेड ) यांनी याप्रकरणी महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

अधिक वृत्त असे की, गफार याने फोनवर बोलायचे आहे, असा बहाणा करून सोनवणे यांच्याकडे मोबाईल मागितला. मात्र, सोनवणे यांनी मोबाईल देण्यास नकार दिल्याने गफार याने सोनवणे यांना चाकूचा धाक दाखवून मोबाईल हिसकावला.

त्यावेळी सोनवणे यांनी आरडाओरडा केल्याने जमा झालेल्या लोकांनी गफार याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी गफार याच्या मुसक्या आवळल्या आहेत. महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

Leave a Comment