पत्नीवर चारित्र्याचा संशय घेवून पेटवून घेतलेल्या जावयाचा मृत्यू

Photo of author

By Sandhya

पत्नीवर चारित्र्याचा संशय घेवून सासुरवाडीला आलेल्या जावयाने रागाच्या भरात घरासमोर अंगावर पेट्रोल ओतून घेवून पेटवून घेतल्याने तो गंभीर होरपळल्याने उपचारा पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक मधील संतोषनगर मध्ये हा प्रकार घडला.    नितीन सुंदर जाधव ( वय – ३९, ) असे या घटनेत मृत्यू झालेल्या जावयाचे नाव आहे. सुंदर जाधव यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

येथील पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नितीन हा त्याची पत्नी व मुलांसह राहत होता. नितीन हा सोमवारी ( दि. ३ ) सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या दरम्यान वाकी बुद्रुक, संतोषनगर येथे सासुरवाडीला आला होता.

पत्नीवर चारित्र्याचा संशय घेवून त्याने रागाच्या भरात घरासमोरच स्वताच्या अंगावर पेट्रोल ओतून घेवून पेटवून घेतले. या घटनेत तो जबर भाजल्याने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिनगारे व गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल देवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment