उकाडयाने कुटुंब झोपले टेरेसवर,चोरट्यांचा घरावर डल्ला

Photo of author

By Sandhya

उकाडा वाढल्याने रात्री कुटुंब घराच्या टेरेसवर झोपण्यासाठी गेल्यानंतर चोरट्यांनी घरावर डल्ला मारून दागिने व रोकड लंपास केल्याची घटना चाकण जवळ रासे फाटा येथे घडली.

रात्रीच्या वेळी घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल फोन चोरून नेला.
अरुण नारायण पवार ( वय – ४९, रा. रासे फाटा, चाकण.) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवार, त्यांच्या पत्नी आणि मुले रात्री घराच्या टेरेसवर झोपले होते. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी घराच्या लोखंडी गेटचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.

घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त फेकले. कपाटातून ५० हजार रुपये किमतीचे मिनीगंठण, अंगठी, डोरले, जिरा मणी, दहा हजार रुपये रोख, पाच हजारांचा एक मोबाईल फोन असा एकूण ६५ हजार रुपये किमतीचा ऐवज रातोरात चोरून नेला. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Comment