देशात पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन झालं. देशात अनेक राजकीय घडामोडी घडत असतानाच महाराष्ट्रातील भाजपचे बडे नेते विनोद तावडे यांना पक्षात मोठी जबाबदारी मिळू शकते असं सूचक वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
विनोद तावडेंनी पक्षाच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी ही यशस्वीपणे पुर्ण केलेली आहे. त्याचबरोबर पक्ष चालवण्यासाठी विनोद तावडेंची भूमिका महत्त्वाची आहे, त्यामुळे त्यांना मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते असं पाटील यांनी म्हटलं आहे.
भाजपमध्ये पक्षाच्या अध्यक्षपदाच्या चर्चा आहे, त्याचबरोबर वरिष्ठ पातळीवर बदल होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर विनोद तावडेंना कोणती मोठी जबाबदारी मिळणार हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.
काय म्हणालेत चंद्रकांत पाटील? विनोद तावडे हे कर्तृत्त्वान व्यक्तीमत्व आहे. जिथे पाठवू तिथे यश कसे मिळेल त्याचे बारकाव्याने ते प्रयत्न करतात. आज मोठा पक्ष चालवण्यामध्ये त्यांची भूमिका आहे.
त्यामुळे केंद्र ठरवेल त्यांना काय द्यायचं. त्यांच्याबाबतीत अनेक ऑप्शन चर्चेत आहेत. ते काहीही झाले तरी मोठेच होतील. त्यामुळे मला खूप आंनद होईल.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची नावांमध्ये तावडेंची चर्चा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत चर्चेतील नाव आहे ते म्हणजे विनोद तावडे याचं. विनोद तावडे यांचे एक नाव चर्चेत आहे. गेल्या काही वर्षांत त्यांच्या कामामुळे ते पुढे आल्याचं सांगितलं जात आहे.
महाराष्ट्रातून आलेले विनोद तावडे हे राज्य सरकारमध्ये मंत्रीही राहिले आहेत. सध्या ते सरचिटणीस असून बिहारचे प्रभारीही आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही त्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती. तावडे यांना अल्पावधीतच मोठे महत्त्व प्राप्त झाले असून ते मोदी सरकारच्या योजनांच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.