चंद्रशेखर बावनकुळे : भाजपच्या मनात देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री

Photo of author

By Sandhya

चंद्रशेखर बावनकुळे

ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात २०२४ ला तुम्हाला मुख्यमंत्री कोण हवा आहे ? या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रश्नावर कार्यकर्त्यांनी एकमुखाने देवेंद्र फडणवीस यांचे नाव एकमुखाने जाहीर केले आहे.

बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांच्या मनातील बात जाणून घेतल्याने अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात आहे. चंद्रशेखर बनवकुळे केवळ एवढ्यावरच थांबले नसून तुमच्या मनात जो मुख्यमंत्री हवा आहे, त्यासाठी आतापासून कामाला लागा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.

त्यामुळे भाजपने शिंदे गटावर दबावतंत्र सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भाजपच्या महाविजय २०२४ अभियानांतर्गत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचे दौरे करीत असून त्यांनी मंगळवारी ठाणे लोकसभा मतदार संघाचा दौरा केला.

या दौऱ्यादरम्यान त्यांनी ठाणे शहरातील गडकरी रंगायतन नाट्यगृह येथे बैठक घेतली. यावेळी त्यांनी ठाणे शहर, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा आणि मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातील भाजपाने नियुक्त केलेल्या एक हजार कार्यकर्त्यांसोबत बावनकुळे यांनी संवाद साधला.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांची ‘मन की बात’ जाणून घेतली. २०२४ मध्ये तुम्हाला मुख्यमंत्री कोण हवा आहे? असा प्रश्न बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना विचारला.

त्यावर ‘देवेंद्र फडणवीस’ यांचे नाव कार्यकर्त्यांनी एकमुखी घेतले. त्यावर आवाज येत नसून जोरात बोला, असे बावनकुळे यांनी सांगितले. यानंतर कार्यकर्त्यांनी पुन्हा ‘ देवेंद्र फडणवीस ‘ यांचे नाव घेतले.

Leave a Comment