CRIME NEWS : अतिशय धक्कादायक..! पत्नीचा धारदार कुऱ्हाडीसह कोयत्याचे घाव घालून निर्घृण खून

Photo of author

By Sandhya

पत्नीचा धारदार कुऱ्हाडीसह कोयत्याचे घाव घालून निर्घृण खून

शिळवंडी येथे पतीने पत्नीचा धारदार कुऱ्हाडीसह कोयत्याने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली. आरोपी खूनानंतर स्वत: राजूर पोलिस ठाण्यात हजर झाला. आदिवासी भागातील शिळवंडी येथील संतोष साबळे आणि पत्नी सुनिता यांचा २० वर्षांपूवी विवाह झाला होता.

मात्र काही महिन्यांपासून दोघांमध्ये वाद होत असल्याची माहिती तक्रारीत दिली आहे. काल सकाळी दोघांत किरकोळ कारणाने वाद निर्माण झाला. संतोषने पत्नी सुनिताला शिविगाळ आणि दमदाटी सुरु केली.

भांडणात रागाच्याभरात संतोषने घरातील धारदार कुऱ्हाड आणि कोयत्याने सुनिताच्या डोक्यात घाव घातले. त्यामुळे सुनीता ही रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तिचा जागीच मृत्यु झाला.

तर आरोपी संतोषने पत्नीचा खून करुन स्वतःहून राजूर पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली. सहायक पोलीस निरिक्षक दिपक सरोदे यांनी पोलिसा पथकासह घटनास्थळी भेट देऊन घडलेल्या घटनेचा पंचनामा केला. भा.द वि.कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत सुनिताचा मृतदेह राजूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. तसेच आरोपी संतोष साबळे याला अटक करण्यात आली आहे.

पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कावळे पो. कॉ. दिलीप डगळे पो. कॉ. विजय मुंडे पो. कॉ.अशोक काळे महिला पोलीस कॉन्स्टेबल दिपाली रहटल करीत आहे.

Leave a Comment