कॉंग्रेस पक्षाने गरीबी हटावच नारा दिला मात्र सत्तर वर्षात गरीबी हटविलीच नाही. परंतु नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताच दहा वर्षात धन्नाशेठकडील काळा पैसा काढून गरिबांचा विकास केला असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
जळगाव येथे सागर पार्क मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत युवा संवाद र्कायक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात तब्बल २५ कोटी लोकांना गरिबीच्या रेषेच्यावर आणले आहे.
गरिबांसाठी त्यांनी चांगल्या योजना राबविल्या. घर दिले, प्रत्येक घरात पाणी दिले. धन्नाशेठच्या घरातील काळा पैसा काढून गरिबांचा विकास केला. युवकांना रोजगाराची संधी दिली, आगामी पाच वर्षात मोदी यांना निवडून देवून भारताचा विकास करायचा आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात देशाचा विकास केला आहे. युवकांसाठी कार्य केले आहे.येत्या लोकसभा निवडणुकीतही मोदींना मतदान करून भारताच्या विकासाच्या संकल्पाला साथ द्यावी असे आवाहान केले.