अमित शहा : बीजेपीला मतदान म्हणजे मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान…

Photo of author

By Sandhya

अमित शहा

२०२४ च्या निवडणुकीसाठी आम्ही आपल्यासमोर जरी आलो असलो, तरी ही निवडणूक भारताच्या भविष्यासाठी आहे. या निवडणुकीत मतदान करताना युवकांनी २०४५ चा भारत आपल्या डोळ्यासमोर ठेवून मतदान करावे, युवकांनी लोकशाही मजबूत करण्यासाठी देशासाठी मतदान करावे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी युवकांशी संवाद साधताना केले.

जळगाव येथे आज (दि.५) भाजपाच्या वतीने युवा संवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी युवकांशी संवाद साधताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी सुरूवात केली. ही निवडणूक युवकांची आहे.

निवडणूक भारताच्या भविष्याची आहे. भारतीय जनता पक्षाला मतदान म्हणजे पंतप्रधान मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनण्यासाठी टाकलेलं आपलं मतदान असेल. मतदान त्याच पक्षाला करा, जो पक्ष देशाला विश्वगुरूपर्यंत नेऊन ठेवेल.

जो पक्ष परिवारवादाने चालतो, तो देश मजबूत करू शकते का? असा सवाल त्यांनी यावेळी युवकांसमोर उपस्थित केला. पंतप्रधान मोदी यांनी दहशदवादी व नक्षलवादी हल्ल्यांपासून भारताला सुरक्षित करण्याचे काम केले आहे. 

मोदींनी भारताला समृद्धच केले आहे. मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान झाले. त्यावेळेस आपल्या देशाची अर्थव्यवस्था अकरावा नंबरवर होती. मोदींनी ती पाचव्या क्रमांकावर आणली. ही भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणण्याची गॅरंटी मोदींची असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave a Comment