धक्कादायक..! चालत्या टॅक्सीत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Photo of author

By Sandhya

चालत्या टॅक्सीत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार!

चौदा वर्षीय मुलीचे अपहरण करून चालत्या टॅक्सीत तिच्यावर बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. टॅक्सीचालक श्रीप्रकाश पांडे आणि सलमान शेख अशी आरोपींची नावे असून दोघेही २५ ते २७ वर्षे वयोगटातील आहेत. त्यांना न्यायालयाने २५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलबार हिल परिसरात राहणाऱ्या पीडित मुलीचे मंगळवारी (ता. १९) रात्री तिच्या कुटुंबीयांशी भांडण झाले होते. त्यानंतर ती रागाने घर सोडून मालवणीत राहणाऱ्या नातेवाईकाकडे जाण्यासाठी टॅक्सीत बसली.

मात्र, टॅक्सीचालक तिला दादरला घेऊन गेला. तिथे त्याने आपला साथीदार सलमानला सोबत घेतले. दरम्यान, मुलगी बेपत्ता झाल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी मलबार हिल पोलिस ठाण्याशी संपर्क साधून अपहरणाची तक्रार दिली.

मलबार हिल पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांना पीडित मुलगी मालाड परिसरात नातेवाईकाच्या घरी गेल्याचे समजले. तिला घरी आणण्यासाठी पोलिसांचे पथक तिथे पाठवण्यात आले. तेव्हा मुलीने आपल्यासोबत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.

पोलिसांनी सीसी टीव्ही फुटेजसह विविध प्रकारे टॅक्सीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके तयार केली. त्यानंतर श्रीप्रकाश पांडे आणि सलमान शेख यांना ताब्यात घेण्यात आले.

Leave a Comment