पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कडून पुरंदर तालुक्यातील विविध गावांतील रस्ते सुधारण्याच्या कामासाठी २० कोटी ८४ लाख ५ हजार ७८५ रूपयांच्या निधीची मंजुरी मिळाली असून लवकरच ही कामे सुरु होतील अशी माहिती पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. या भरघोस निधीमुळे रस्त्याची परीस्थिती सुधारून याचा शेतकरी तसेच नागरीकांना फायदा होणार आहे.
यामध्ये कोडीत ते सोमुर्डी रस्ता सुधारणा करण्यासाठी २ कोटी ९८ लाख ४७ हजार ९३० रूपये. सिंगापूर ते चौंडाईमंदिर रस्ता सुधारणा करण्यासाठी १ कोटी ९ लाख ६५ हजार ७६१ रूपये.
उदाचीवाडी – गुरोळी – पन्हाळवाडी जोडमार्ग रस्ता सुधारणा करण्यासाठी २ कोटी २८ लाख ३३ हजार ६७९ रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. याबरोबरच गुरोळी ते कानिफनाथ मंदिर रस्ता सुधारणा करणे, गुरोळी ते बेटदरा रस्ता सुधारणा करणे आणि गुरोळी खराडेवस्ती ते महादेव मंदिर रस्ता सुधारणा करण्यासाठी २ कोटी १४ लाख ५० हजार ९८३ रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.
हवेलीतील वडकी गाव ते वडकी नाला रस्ता सुधारणा करण्यासाठी १ कोटी २३ लाख ८४ हजार ६२२ रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.
तसेच पुरंदरच्या पश्चिम भागातील गोगलवाडी ते पठारवाडी ग्रामीण मार्ग रस्ता सुधारण्यासाठी २ कोटी ९४ लाख २७ हजार १५४ रुपये. सोमुर्डी ते काळुबाईवाडी रस्ता सुधारण्यासाठी ८५, लाख ३७ हजार २६४ रुपये. रावडेवाडी ते दरेवाडी रस्ता सुधारण्यासाठी १ कोटी ८२ लाख ४ हजार ८५८ रुपये.
तसेच उदाचीवाडी – वनपुरी ते सोनोरी रोड रस्ता सुधारण्यासाठी १ कोटी ३४ लाख ८६ हजार २६९ रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. याबरोबरच हिवरे ते कोडीत रस्ता सुधारणा करण्यासाठी ९६ लाख ३२ हजार ७२० रुपये. बोपगाव घाट रस्ता राष्ट्रीय मार्ग १३१ ते आस्करवाडी रस्ता सुधारणा करण्यासाठी
१ कोटी २० लाख ३३ हजार ९६० रुपये. सोनोरी ते मल्हारगड रस्ता सुधारणा करण्यासाठी ९१ लाख ७६ हजार ५३१ रुपये आणि कोडीत बु.।। तुळाजीबाबा मंदिर ते मळईवस्ती पालखी मार्ग रस्ता सुधारणा करण्यासाठी १ कोटी ४ लाख २४ हजार ६४ रुपये.
याप्रमाणे एकूण २० कोटी ८४ लाख ५ हजार ७८५ रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार संजय जगताप यांनी दिली. यासाठी खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार संजय जगताप यांनी पीएमआरडीएकडे पाठपुरावा केला आहे.