
पालघर पॅटर्नचा विचार करता सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात आमच्यातील एकाने भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली तर बिघडते कुठे,
असा सवाल शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला. त्यामुळे दिवसभरात चर्चा सुरू होती. भाजप व शिंदे शिवसेना यांच्या युतीत रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा कोणाच्या वाट्याला यावी, यावरून स्थानिक पातळीवर राजकारण तापले आहे.
येथून शिवसेनेतर्फे किरण सामंत आणि दीपक केसरकर यांचे नाव चर्चेत आहे. ही जागा शिवसेनेकडे असावी, अशी मागणी त्यांच्या गटाकडून होत आहे. दुसरीकडे आमदार नितेश राणे व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी येथील उमेदवार भाजपचाच असेल, असे वक्तव्य केले आहे.
या पार्श्वभूमीवर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘पालघरमध्ये भाजपचा उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवत असेल तर सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात आमच्यातील एकाने भाजप चिन्हावर निवडणूक लढवली तर बिघडले कुठे? पालघरमध्ये भाजपचा उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर उभा राहिला होता.
केसरकर म्हणजे सावंतवाडीतील मोती तलावातला डोमकावळा केसरकर म्हणजे सावंतवाडीतील मोतीतलावातला डोमकावळा आहे. हा केवळ पदासाठी सत्तेत आला आहे. त्यांच्या शिवसेनेत येण्याला आमचा विरोध होता, कारण हा सत्तेसाठी पाठीत चाकू खुपसून निघून जाईल.
आता आम्हाला खात्री आहे की हा शिंदेच्या पाठीत चाकू खुपसून भाजपत निघून जाईल, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.