मंत्रालय नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच एक ते दोन दिवसात अतिरेकी हल्ल्याची धमकी फोन करणाऱ्याने दिली आहे.
मंत्रालय नियंत्रण कक्षातील लँड लाईनवर काल रात्री 10 वाजता हा फोन आला होता. या धमकीच्या फोनंतर एकच खळबळ उडाली असून मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. त्यादृष्टीने आता पोलिस आरोपीचा शोध घेत आहे.
मात्र हा फोन नेमका कोणी केला आणि धमकी देण्याचा उद्देश काय होता? याचा आता पोलिस तपास करणार आहे. याशिवाय पोलिस हा कॉल ट्रेस करत असून लवकरच आरोपीला अटक होण्याची शक्यता आहे.
तसेच तपासात कांदिवली येथून एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती देखील समोर आहे. त्याअनुषंगाने पोलिस पुढील तपास करणार आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपासून वारंवार धमकीचे असे फोन येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.