मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुढीपाडवा तसेच मराठी नूतन वर्षानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी शुभेच्छा देतांना शिंदे यांनी विरोधी पक्षातील नेत्यांवर खोचक टीका केली. ठाणे, डोंबिवली येथील गुढीपाडवा निमित्त निघणाऱ्या शोभायात्रेत मुख्यमंत्री यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी जनतेला गुढी पाडवा व मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.’नववर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा…हा पाडवा सगळ्यांना सुखा-समाधानाचा आणि समृद्धीचा जावो.
आज महाराष्ट्रात सगळीकडेच पाडव्यानिमित्त जल्लोषात शोभायात्रा निघाल्या आहेत. आपली मराठी संस्कृती, परंपरा टिकवण्याचं काम अशा शोभायात्रांमधून होत असतं. इथे अनेक संस्था, त्यांचे चित्ररथ सहभागी होतात. यातून समाजाला एक संदेश दिला जातो”
एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळावर टीका ते पुढे म्हणाले,’गेल्यावेळी सरकार स्थापन होण्यापूर्वी आधीच्या सरकारमध्ये अडीच वर्षांत सर्व सण-उत्सव बंद होते. पण आपलं सरकार आल्यानंतर सणांवर असणारी बंदी आपण उठवली.
लोक मोकळा श्वास घेऊ लागले. आम्ही सणांप्रमाणेच विकासावरचीही बंधनं काढली. हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. प्रगती आणि विकासाला आडवा जो कुणी येईल, त्याला आडवा करून आमचे लोक गुढी पाडवा साजरा करतील.’असा टोला मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला.