आनंदाची बातमी, लाडक्या बहिणींची रक्‍कम होणार दुप्‍पट ! मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा

Photo of author

By Sandhya

मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही नेहमी सुरु राहावी यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. ही योजना बंद तर पडणार नाहीच उलट लाभाची रक्कम ही टप्प्या टप्प्याने दुप्‍पट करण्‍यात येईल, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी लाडक्या बहिणींना दिला.

छत्रपती संभाजीनगर येथे ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान’ अंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान’ आणि ‘राज्यस्तरीय विविध योजनांचा लोकार्पण सोहळा’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला.

एकनाथ शिंदे म्हणाले, महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु केली आहे. या योजनेतून महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे.

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात सुरु करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यापूर्वी तीन महिन्यांचे साडेचार हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा केले आहेत.

या योजनेतून मिळणाऱ्या रक्कमेतून काही महिलांनी छोटे-छोटे व्यवसाय सुरु केले असून त्यामधून रोजगार आणि आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण झाले आहे. या महिला स्वतःच्या पायावर उभा राहिल्या आहेत, असेही ते म्हणाले. 

Leave a Comment

You cannot copy content of this page