पुरंदर – हवेलीतील विविध विकासकामांसाठी भरघोस निधी…. 

Photo of author

By Sandhya

पुरंदर – हवेली मध्ये विविध विकासकामांसाठी शासनाच्या वेगवेगळ्या विभागांतून विविध योजनांतून भरघोस निधी उपलब्ध झाल्याचे पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी सासवड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यामध्ये रस्ते, पाणी, साकव, तिर्थक्षेत्र विकास, पर्यटन विकास, शिवसृष्टी, काँक्रिटीकरण, पालखीतळ मार्गावरील सुविधा, औद्योगिक क्षेत्रातील सुविधा, जलजीवन मिशन, पुरंदर उपसा जलसिंचन योजना आदींचा समावेश आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात ११७ कोटी रूपयांची विकासकामे मंजूर झाली आहेत. यामध्ये श्रीक्षेत्र वीर येथील पुर्णगंगा ओढ्याजवळ संरक्षण भिंतीचे बांधकाम व परीसर सुशोभीकरणासाठी २ कोटी ५० लाख रुपये, सटलवाडी – पिंगोरी, कोळविहीरे – मावडी क प – पांडेश्वर या रस्त्यावर लहान पुलांच्या कामासाठी ५ कोटी रुपये,

वीर ते हरणी रस्त्यासाठी २ कोटी रुपये, चांबळी ते प्रजिमा ३६ ला जोडणा-या रस्त्यासाठी २ कोटी ५० लाख रुपये, पारगाव – नायगाव, यवत – माळशिरस – सासवड रस्ता सुधारणेसाठी ६८ लाख रुपये, खडीमशीन चौक-सासवड- वीर सुधारणेसाठी ५४ कोटी ३८ लाख रुपये आणि हवेलीतील आंबेगाव येथे शिवसृष्टी उभारणेसाठी ५० कोटी रुपये या कामांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती आ जगताप यांनी दिली. 

पुरंदर तालुक्यातील जिल्हा आणि राज्य मार्गांसाठी खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार संजय जगताप यांच्या पाठपुराव्याने प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ३१ कोटी ४२ लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

यामध्ये प्रकल्प जिल्हा मार्ग ४९ माहूर – तोंडल या ५ किमी अंतराच्या रस्त्यासाठी ३ कोटी ४१ लाख ५७ हजार रुपये, राज्य मार्ग जेऊर – पिसुर्टी – वाल्हा या ५ . ५ किमी अंतराच्या रस्त्यासाठी ५ कोटी १२ लाख १९ हजार रुपये आणि प्रकल्प जिल्हा मार्ग ५० वाल्हा – मांडकी – वीर या रस्त्याच्या कामासाठी ६ कोटी ४८ लाख रुपये,

राजुरी ते पोंढे या ८ किमी अंतराच्या प्रकल्प जिल्हा मार्गासाठी ७ कोटी १ लाख रुपये, राज्य मार्ग १३१ पांगारे – हरगुडे – यादववाडी या ७ किमी अंतराच्या रस्त्यासाठी ४ कोटी ५४ लाख ८९ हजार रुपये, आणि पिसर्वे ते माळशिरस या ६ . ५ किमी अंतराच्या प्रकल्प जिल्हा मार्गासाठी ४ कोटी ८४ लाख रुपयांच्या निधीला शासनाकडून मान्यता मिळाली असून येत्या काळात निधी मिळून कामाला सुरुवात होईल असे आ जगताप यांनी सांगितले.

Leave a Comment